पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, मुंबईत डिझेलचीही शंभरी पार; वाचा ताजे दर
मुंबई | रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) थेट फटका जागतिक बाजाराला बसला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असताना अनेक देश महागाईचा सामना करत आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली असताना भारतात मात्र आज आठव्यांदा इंधन दरवाढ झाली आहे.
गेल्या 9 दिवसात आज आठव्यांदा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर वाढले आहेत. तब्बल साडेचार महिने पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळाल्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 9 दिवसात पेट्रोलच्या दरात तब्बल 6 रूपयांनी वाढ झाली आहे.
आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर मागे 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शंभरी पार झाली आहे. मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 115.88 रूपये मोजावे लागत आहेत. तर प्रतिलीटर डिझेलचे दर 101.01 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीत पेट्रोल 101.01 तर डिझेल 92.27 रूपये प्रतिलीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 115.69 आणि डिझेल 98.40 रूपये प्रतिलीटर आहे. पुण्यात प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 114.71 रूपये व 97.46 रूपये मोजावे लागत आहेत. महागाईचा भडका उडालेला असताना सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
थोडक्यात बातम्या-
“अजित पवारांचा घोटाळा सिद्ध झालाय, माझी भारत सरकारला विनंती आहे की…”
“मी आमदार खासदार जन्माला घालणारा माणूस, त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी…”
Deltacron व्हेरियंटने टेन्शन वाढलं! तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले…
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
Corona: कोरोनाच्या वाढत्या शिरकावामुळे ‘या’ ठिकाणी चिंतेचं वातावरण
Comments are closed.