पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; वाचा आजचे ताजे दर
नवी दिल्ली | कोरोनाच्या महामारीनं सगळीकडे हाहाकार माजला आहे. कोरोनामुळं अनेकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सामान्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसत आहे.
आज सलग 17व्या दिवशी देशभरात इंधन दर स्थिर असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी इंधन दरवाढीवरून सरकारला घेरले होते. त्यामुळे कंपन्यांनी तूर्तास इंधन दर जसे आहेत तसेच ठेवले आहेत. 17 जुलैनंतर डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 29 ते 30 पैशांची वाढ करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलचे दर जरी कमी-जास्त होत असले तरी आज देशात इंधन दर स्थिर असलेले पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवून मोदी सरकारने काहीसा दिलासा दिला असला तरी इंधनावरील करात कोणत्याही परिस्थितीत कपात होणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेशच केंद्रानं दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, मुंबईत आजचा एक लिटर पेट्रोलचा दर 107.83 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर 102.49 रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लिटर पेट्रोल 102.08 रुपये झाले आहे. मुंबईत आज मंगळवारी डिझेलचा दर 97.45 रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल 89.87 रुपये आहे. चेन्नईत 93.63 रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा दर 93.02 रुपये प्रति लिटर झाला आहे.
थोडक्यात बातम्या –
“सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या, आमचा सीएम जगात भारी”
भारतीय पुरूष हाॅकी संघाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून भारताचा पराभव
नियतीने घात केला अन् हिमालयाएवढ्या उंचीचा, कैलास भारत पवार गेला…
लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का, पाहा व्हिडीओ!
भारताला मिळाला ‘हा’ मोठा मान; पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार इतिहास
Comments are closed.