मुंबई | ठाकरे सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करावेत आणि इंधन भाववाढ नियंत्रणात आणावी, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
दांभिकपणा भाजपच्या पाचवीवा पुजला आहे. फडणवीसांच्या काळात पेट्रोल-डिझेलची किंमत महाराष्ट्रात सर्वाधिक होती, असं म्हणत सचिन सावंतांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्यु्त्तर दिलं.
दुष्काळाचा अधिभार दुष्काळ संपला तरी दारुची दुकाने बंद झाली म्हणून लावलेला सेस दुकाने सुरु झाली तरी वसूल केला होता. आणि आज फडणवीसजी त्यांनी इंधनकर कमी केले असं म्हणतात, असं सावंतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. दिवसेंदिस वाढणारे दर पाहता आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे.
थोडक्यात बातम्या-
“‘रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजप नाही”
मायदेशातील कसोटीत पहिला बळी घेत बुमराहने केला श्रीगणेशा, पाहा व्हिडीओ
आर. आर. पाटलांच्या पोलिस बंधूंचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार; अजित पवार भावूक, म्हणाले…
काँग्रेस हायकमांडने प्रणिती शिंदेंवर सोपवली ‘ही’ नवीन जबाबदारी
‘मराठ्यांसह ‘यांनाही’ आरक्षण द्या’; रामदास आठवलेंची मागणी