पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
नवी दिल्ली | साडेचार महिने स्थिर राहिलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) 22 मार्चपासून सातत्याने वाढ पाहायला मिळत होती. त्यानंतर 6 एप्रिल नंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. आज सलग 28व्या दिवशी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती स्थिर असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास 10 रूपयांनी महागले होते.
राजधानी दिल्लीत आज प्रतिलीटर पेट्रोलसाठी 105.41 रूपये तर डिझेलसाठी 96.67 रूपये मोजावे लागत आहेत. तर मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचे दर 120.51 रूपये व डिझेलचे दर 104.77 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. पुण्यात पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 120.20 रूपये व 103.10 रूपये आहे.
दरम्यान, नागपुरात प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलमागे अनुक्रमे 120.40 व 103.73 रूपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत 121.13 रूपये तर 1 लिटर डिझेलची किंमत 103.79 रूपये आहे. वाढत्या महागाईत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वासामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मग ते भोंगेही उतरवा तरच तुम्ही हिमतीचे’, शिवसेनेचं भाजपला खुलं आव्हान
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या राज्यांना महत्त्वाच्या सूचना, म्हणाले…
‘धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही’; अजित पवारांचा हल्लाबोल
राणा दाम्पत्यांना पुन्हा न्यायालयाचा झटका, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
“राज ठाकरेंना तुरुंगात टाका, त्यांचं डोकं शांत होईल”
Comments are closed.