पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?, वाचा एका क्लिकवर
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ उतार झालेली पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रतिबॅरलवर असताना भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराने (Petrol-Diesel Price) उच्चांक गाठला आहे.
22 माार्चपासून तब्बल 14 वेळेस पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत वाढ झाली आहे. तेल कंपन्यांकडून आज इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले असून पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. इंधनाच्या दरात सलग दोन दिवस कोणतेही बदल न झाल्याने सर्वसामान्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.
मुंबईत (Mumbai) प्रतिलीटर पेट्रोलसाठी 120.51 रूपये तर प्रतिलीटर डिझेलसाठी (Diesel) 104.77 रूपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोलचे दर 105.41 रूपये तर डिझेलचे दर 96.67 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
दरम्यान, राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणी (Parbhani) जिल्ह्यात मिळत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 1.50 रूपयांनी वाढून 123.53 रूपयांवर जाऊन पोहोचला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना देशात इंधनाच्या दराने उच्चांक गाठला आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?”, नारायण राणेंचा शिवसेनेला सवाल
कोरोनानंतर नव्या व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ आजाराची लक्षणंही कोरोना सारखीच
मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलंय का? – संजय राऊत
संजय राऊतांचं मुंबईत शक्ती प्रदर्शन, भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले…
Comments are closed.