पुणे | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन जिकीरीचे प्रयत्न करत आहेत. याचा एक भाग म्हणून शासनाने संचारबंदीही लागू केली आहे. मात्र तरीही काही व्यक्ती रस्त्यांवर, पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींनाच फक्त पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. यामध्ये पोलिस, फार्मासिस्ट, डॉक्टर तसंच पत्रकार हे समाविष्ट आहेत.
पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर करोनाचा झपाट्यानं प्रसार झाला. पिंपरी-चिंचवड शहरातही करोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढली. त्यामुळे शासनाने जनतेवर विविध निर्बंध लादले आहेत.
पुण्यानंतर राज्यातील इतर भागात करोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्य सरकारनं साथरोग प्रतिबंधक कायदा राज्यात लागू केला. त्याचबरोबर गर्दी रोखण्यासाठी संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंचा संयमीपणा… राज्यातील नागरिक, पोलिस तसंच केंद्र शासनाचे मानले आभार!
‘गो करोनिया गो’…. पाहा विनोदवीर कुशल बद्रिकेचं भन्नाट गाणं
Comments are closed.