पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात; पहा आजचे दर

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या कमी होत जाणाऱ्या किंमती यामागील कारण आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रतिलिटर 17 पैशांनी कमी झाल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 83 रुपये 40 पैसे तर डिझेलचा दर 76 रुपये 5 पैसे झाला आहे. 

गेल्या 24 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये सतत घट होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळत असला तरी किंमती 80 रुपयांच्या खाली जात नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आॅक्टोबर 2018 रोजी कच्चे तेल 86.74 डाॅलर प्रति बॅरल होतं. ज्यात 9 नोव्हेंबर 2018 ला घसरण होऊन 69.70 डाॅलर प्रति बॅरल झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आठवडा उलटला; अवनीच्या त्या 2 बछड्यांचं नेमकं काय झालं?

-अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

-‘आणि… घाणेकर’साठी मनसे आक्रमक; खळ्ळ खटॅकचा इशारा

-पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे- उद्धव ठाकरे

-अवनी प्रकरणी नितीन गडकरींची सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट