बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांना एवघ्या एका रुपयात पेट्रोल, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पुणे | राज्याचे उपमुख्यमंंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर अनेक उपक्रम आयोजित केले होते. अशाच प्रकारे पुण्यात एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 1 रूपया प्रतिलीटर पेट्रोल वाटप केलं गेलं त्यामुळे पुण्यात सर्वत्र या उपक्रमाची चर्चा होती.

पुण्यात धानोरीमध्ये एक रुपयात 1 लीटर पेट्रोल दिलं गेलं. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला होता. राज्यात 107 रूपये प्रतिलीटर पेट्रोल चालू आहे त्यामुळे सामान्य माणूस वैतागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर शिबिराच्या माध्यमातून मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी करण्याचा विचार आहे.

कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी रक्तदान किंवा आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

राज्याला ड्रायव्हर नको, चांगला मुख्यमंत्री हवा- नारायण राणे

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच, वाचा देशातील आकडेवारी

‘देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं’; भाजपची जहरी टीका

खडकवासला धरणातून विसर्ग सुरु, महानगरपालिकेचा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

कोकणात पावसाचा रुद्रावतार, चिपळूण शहर पाण्यात…

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला भाजपची लाख मोलाची मदत, तब्बल 20 लाखाचं फेडलं कर्ज

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More