बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात पेट्रोलने गाठली शंभरी; इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री

पुणे | गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ थांबवण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरावल्याचे चित्र गेल्या महिना दीड महिन्यापासून पाहायला मिळत होते. त्यानंतर देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या आणि इंधन दरवाढीला मोठ्या प्रमाणात वेग आला.

मागच्या आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आठवडाभरात 6 वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. पुण्यात आजच्या पॉवर पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पुण्यातील पॉवर पेट्रोलचा आजचा दर 101.74 पैसे प्रति लिटर एवढा आहे.

साधे पेट्रोल 98.06 पैसे प्रति लिटर या दराने पुण्यात सध्या विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलचा भडका पुन्हा एकदा उडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. तसेच पुण्यात आज पेट्रोलच्या किमतीने शंभरी गाठल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

आज पुण्यात साधे पेट्रोल 98.06 पैसे तर पॉवर पेट्रोल 101.74 पैसे प्रति लिटर या दराने असून डिझेलचा दर 88.08 पैसे प्रति लिटर एवढा नोंदवण्यात आला आहे. इंधन दरवाढीतून सामान्यांना दिलासा कधी मिळणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

थोडक्यात बातम्या –

रमजान ईदनिमित्त गृह विभागाकडून ‘या’ मार्गदर्शक सुचना जारी 

‘सोनिया गांधी सामनाची दखल घेतात’; संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे

खुशखबर! 2 ते 18 वर्षांच्या मुलांनाही आता मिळणार कोरोनाची ‘ही’ लस

कोरोना रूग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करणाऱ्या डाॅक्टराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या ‘या’ जिल्ह्याच्या पॅटर्नची चर्चा संपुर्ण राज्यभरात सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More