देश

पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ पुन्हा सुरु; सलग तिसऱ्या दिवशी भाव वाढले!

मुंबई | पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने नुकताच कुठे सर्वसामान्यांना दिलासा दिला असताना आता पुन्हा दरवाढीला सुरुवात झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झालीय.

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होताना पहायला मिळतोय. आज पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 10 पैशांनी वाढले आहे.

शुक्रवारी पेट्रोलचे भाव 14 पैसे तर डिझेलचे भाव 16 पैशांनी वाढले होते. येत्या काही दिवसांमध्ये इंधनाचे दर आणखी वाढतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आहे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट!

-होय, हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे!

-खाद्यपदार्थ स्वस्त होणार; मनसेच्या दणक्यानं मल्टीप्लेक्स चालक नरमले!

-पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे होणार पालखीत सहभागी?

-बाष्कळ विदर्भाला वेगळं राज्य हवंय, पण वढू-रायगडाला ते मान्य नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या