Top News देश

भारतातील ‘या’ शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार

नवी दिल्ली | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील बहुतांश मेट्रो शहरात पेट्रोल नव्वदीच्या पार पोहोचलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील एका शहरात तर पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

राजस्थानमधील गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. आयओसी वेबसाईटनूसार सामान्य पेट्रोलचा दर इथं ९८.४० रुपये प्रतिलिटर आहे तर एक्स्ट्रा प्रीमिअमसाठी १०१.१५ रुपये प्रतिलिटरसाठी मोजावे लागत आहेत. राजस्थानच्याच जयपुरमध्ये पेट्रोलचा दर ९३.८६ रुपये प्रती लीटर आहे तर डिझेलचा दर ८५.९४ रुपये आहे.

देशातील अन्य शहरांमध्ये दर काय?

पेट्रोलचे दर-

दिल्ली- ८६.३०
मुंबई- ९२.८६
कोलकाता- ८७.६९
चेन्नई- ८८.८२

डिझेलचे दर-

दिल्ली- ७६.४८
मुंबई- ८३.३०
कोलकाता- ८०.०८
चेन्नई- ८१.७१

थोडक्यात बातम्या-

“बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम”

काँग्रेस सूडाच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे- सुधीर मुनगंटीवार

आंदोलन भडकावल्याचा आरोप असलेला दीप सिद्धू आणि भाजपचा संबंध काय?

प्रियकर-प्रेयसीचं नको ते सुरु होतं, तेवढ्यात नवऱ्यानं ठोठावलं दार; घडला धक्कादायक प्रकार

“हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या