बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महामार्गावरील ढाब्यावरच पेट्रोल पंप, काय आहे नितीन गडकरींचा हा नवा प्लॅन?

नवी दिल्ली | केद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या नवनवीन आणि भन्नाट कल्पनांसाठी आणि धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातच त्यांनी आता एक नवी संकल्पना सुचवली आहे. त्यानुसार महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आता इंधन आणि जेवण एकाच ठिकाणी मिळणार असल्याचं नियोजन आहे.

नॅशनल हायवे अथाॅरिटी ऑफ इंडीया म्हणजेच एनएचएआय ही संस्था हायवेवर पेट्रोल पंप टाकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देत असते. त्यानुसार जर याच संस्थेने ढाबा मालकांना पेट्रोलपंप टाकण्याची परवानगी दिली तर त्याचा ढाबा मालकांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनीही फायदा हाेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

रस्त्याच्या कडेला लोक अतिक्रमण करून ढाबे बनवत आहेत. त्यामुळे जर ढाबा मालकांना शौचालय आणि पेट्रोल पंप बनवण्याची परवानगी दिली तर त्याचा फायदा होऊ शकतो, असं म्हणत त्यांनी एमओआरटीएच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यावर आता पुढे काय पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नितीन गडकरींची ही संकल्पना कार्यान्वित होण्यासाठी किती अवधी लागणार या बाबत अद्याप स्पष्टता आली नसली तरी भविष्यात देशात वेगवेगळ्या आणि नवनवीन संकल्पना राबवण्यात येणार यात काही शंकाच नाही.

थोडक्यात बातम्या

“एका महिलेशी कसं बोलावं हे पवारसाहेबांनी शिकवलं नाही का?”

“पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की मोदींची दाढी एक इंच वाढते”

“…तोपर्यंत ड्रग्स प्रकरणाची चौकशी समीर वानखेडेचं करतील”

“ही निवडणूक केवळ देवेंद्र फडणवीसांचं मुंगेरीलालचं स्वप्न”

“आता खरे सुत्रधार बाहेर येतील, ही तर मोदी सरकारला मोठी चपराकच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More