बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

औरगांबाद | मध्यरात्री पेट्रोल देण्यास पेट्रोल कर्मचाऱ्याने नकार दिल्याने कलाकार मंडळीनी चक्क कर्मचाऱ्याला उद्देशून भन्नाट गाणं म्हणायला सुरूवात केली. ‘पेट्रोलवाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना’ असं गाणं ते चक्क पेट्रोलपंपावर म्हणू लागले. या घटनेचा व्हि़डीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या कलाकार मंडळीच्या गाडीतलं पेट्रोल मध्यरात्री औरंगाबाद-जळगाव रोडवर अचानक संपलं. पेट्रोल भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर गेले असता पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोल देण्यास नकार दिला. अशावेळी बायका पोरांना सोबत घेऊन प्रवास कसा करायचा? असा प्रश्न या कलाकारांसमोर होता.

त्यांनी गाण्यात म्हटलंय, “पेट्रोलवाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना..पोरं सोरं सोबत आहेत..पेट्रोल मला द्या ना..रातची वेळ आहे थोडं समजून तुम्ही घ्या ना.. पेट्रोलवाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना..रातची वेळ आहे, तुम्ही 10-5 शिल्लक घ्याना.. पेट्रोलवाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना..” असं गाणं कलाकारांनी पेट्रोलपंपावर म्हटलं

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोल भरण्यास नकार दिल्यानंतरही कलाकारांनी न रागवता आपल्या शैलीत गाणं म्हणायला सुरूवात केली, याचं सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

 

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांना दिवाळीत मिळणार म्हाडाचं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

क्रेडीट कार्डवर मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

इंधन दरवाढीला अखेर लगाम, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

“इंधन दरवाढीविरूद्ध आंदोलन करणारे कोणत्या बिळात लपुन बसले आहेत?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More