बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलाच्या UPSC साठी राहतं घरं विकलं, पोराने IAS होऊन बापाचं स्वप्न पूर्ण केलं!

नवी दिल्ली | भारतीय लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ म्हणून प्रशासकीय सेवांना ओळखलं जातं. प्रशासनात जाण्याचं प्रत्येक मुलाचं लक्ष्य असतं. विविध संस्कृती, भाषा, नागरिकांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा या अधिकारी घडवत असतात. या परिक्षेची तयारी करणं आणि या व्यवस्थेचा भाग होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.

आपली सगळी क्षमता पणाला लावून या परिक्षेची तयारी विद्यार्थी करत असतात. यासाठी त्यांच्या घरच्या व्यक्ती पण खूप त्रास सहन करतात. अशीच कहाणी आहे इंदौरमध्ये राहणारे प्रदीप सिंह यांची, खूप हुशार असणारे प्रदीप सिंह हे गरीब परिस्थीतीत वाढले. त्यांचे वडिल पेट्रोल पंप कर्मचारी आहेत. अतिशय हालाखीची परिस्थिती असूनही अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी जिल्हाधीकारी होण्याचं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

कायम आपल्या मुलाने मोठं व्हावं हा विचार करणारे प्रदीप यांचे वडील मनोज सिंह बिहारच्या गोपालगंज येथील राहणारे आहेत. हाती पडेल ते काम करायचं ते एका पेट्रोल पंपावर कर्मचारी आहेत तर, आई गृहिणी आहे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती इतकी बिकट होती की, आपल्या मुलाच्या युपीएससीच्या तयारीसाठी त्यांनी आपलं राहतं घरही विकलं आणि भाड्याच्या घरात राहयला सुरूवात केली.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रदीप यांनी आपलं शिक्षण सिबिएससी मधून पुर्ण केलं. बिकाॅममधून पदवी मिळवून त्यांनी प्रशासकीय सेवेचं शिखर गाठलं आहे. 2018 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी देशातून 93 वा क्रमांक मिळवत जिल्हाधीकारी पदाला गवसणी घातली. त्यांनी आपली तयारी दिल्ली येथे केली.

थो़डक्यात बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रासोबत चर्चा करायला पाहिजे होती – रावसाहेब दानवे

‘सत्ता आली तरी तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानं दिला घरचा आहेर

‘…तर सिनेमाचं तिकिट आणि पाॅपकाॅर्न मिळणार फ्री’; पीव्हीआरची भन्नाट ऑफर

मनसेकडून ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचं स्वागत!

रोख व्यवहार करणाऱ्यांनो वेळीच व्हा सावधान; 10 व्यवहार केल्यानंतर….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More