भाजप सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल 5 रूपयांनी स्वस्त

मुंबई | केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीत कपात केली. त्यानंतर फडणवीस सरकारनं कर कपात केल्याने महाराष्ट्रात पेट्रोल 5 रूपयांनी स्वस्त झालं आहे. 

केंद्र सरकारकडून पेट्रोलचे दर 1.5 रूपयांनी कमी केल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेलटींनी केली. तेल कंपन्यांनाही पेट्रोलचे भाव 1 रूपयाने कमी करण्यास सांगितलं होतं. त्यासोबतच राज्य सरकारलाही भाव कमी करण्यासाठी सांगितलं होतं. 

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राज्याकडून अडीच रूपयांनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत. तसंच जेटलींनी घेतलेल्या निर्णयावरून त्यांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, केंद्र सरकारने दीड रूपया, तेल कंपन्यांनी 1 रूपया आणि राज्याने अडीच रुपये कमी केल्याने एकूण 5 रूपयांनी पेट्रोल स्वस्त झालं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

-किमान 3-4 मंत्र्यांना कपडे काढून मारा, पोलिस तुम्हाला काहीच करणार नाही!

-शेट्टींनीं सांगितलं तर एखाद्या मंत्र्याला भोकसायला कमी करणार नाही!

-अभिनेता शाहरुख खानच्या मुलीचं मैत्रिणींसोबत हॉट फोटोशूट

-विरोधकांना ‘जोर का झटका’; त्रिपुरामध्ये भाजपचा दणदणीत विजय

-पहिला सामना अन् पहिलाच डाव; अवघ्या 18 वर्षीय पृथ्वीनं ठोकलं विक्रमी शतक

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या