निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

मुंबई |नुकतेच पाच राज्यांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निकालांमध्ये सत्ताधारी भाजपची जोरदार पिछेहाट होताना दिसून आली. मात्र निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोलच्या दरात कपात होत होती. मात्र पेट्रोलचे दर आज 9 पैसे ते 30 पैशांनी वाढले आहेत.

तब्बल 88 रूपयांचा आकडा गाठलेलं पेट्रोल निवडणुकीच्या काळात 75.34 रूपयांपर्यंत येऊन पोहचलं होतं. त्यामुळे काही दिवस नागरिकांना दिलासा मिळाला होता.

दरम्यान, आज तब्बल 58 दिवसांनी पेट्रोलचे भाव वाढल्याने दरवाढीचा हा सिलसिला असाच चालू राहिल का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 

महत्वाच्या बातम्या 

-‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….

-माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल

-तीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक

“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”

-डिलिव्हरी बाॅयच्या व्हायरल व्हीडिओनंतर झोमॅटोचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय