‘या’ नागरिकांना मिळणार स्वस्त दरात पेट्रोल, सरकारची मोठी घोषणा
नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून गरीब जनतेला गहू, तांदूळ, साखर, तेल या काही जीवनावश्यक वस्तू कमी दरांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. ज्या लोकांकडे केशरी, पिवळे रेशनकार्ड आहे त्यांना या सुविधेचा लाभ मिळतो. कोरोना काळामध्ये केंद्र सरकारकडून गरिबांना मोफत धान्य देण्यात आले होते. त्यातच आता रेशनकार्डवर पेट्रोलची देखील सुविधा मिळणार आहे.
झारखंड सरकारने रेशनकार्ड धारकांना 26 जानेवारीपासून स्वस्त दरात पेट्रोल दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. झारंखंडमधील सुमारे 20 लाख लोकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. लाल, पिवळे, हिरवे शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या लोकांकडे झारखंड येथील नोंदणीचे वाहन असेल त्या लोकांना या योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो. प्रत्येक महिन्याला योजनेच्या लाभाचे 250 रूपये लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरिक करण्यात येणार आहेत. सदर पेट्रोल सबसिडी योजनेनुसार लाभार्थ्यांला 10 लिटरपेट्रोेलवर 25 रूपये सबसिडीस देण्यात येणार आहे.
दरम्यान, पेट्रोल पंपवर पेट्रोल खरेदी करताना रेशन कार्ड धारकांना पुर्ण रक्कम भरावी लागणार आहे. महिन्याच्या शेवटी झारंखंड राज्य सरकार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 250 रूपये जमा करणार आहे. सध्या वापरात असलेल्या शिधापत्रिकेवरचं या योजनेचा लाभ मिळणार आहे.
थोडक्यात बातम्या-
मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूशखबर! आता 28 नाही तर ‘एवढ्या’ दिवसांचा असणार रिचार्ज प्लॅन
आता ऑनलाईन परिक्षेतही विद्यार्थ्यांवर राहणार वाॅच, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा निर्णय
Petrol Diesel Price: जाणून घ्या आजचे ताजे दर
कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली, WHO म्हणाले…
‘या’ तारखेपासून पुण्यातील शाळा सुरु होणार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा
Comments are closed.