बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोलियम कंपन्यांचा सर्वसामान्यांना सलग दुसऱ्या दिवशी दिलासा!

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस मेताकुटीला आला असतानाच गेल्या काही दिवसात या इंधनाचे दर हे चढत्या क्रमात वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज इंधनांच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असताना आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

इंधनाचे वाढते दर हा चिंतेचा विषय बनला असताना काल पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर न वाढवण्याचा निर्णय घेतला होता, तर आजही कंपन्यांनी तोच निर्णय लागू राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलचा दर हा ‘जैसे थे’च असणार आहे. पण सध्या डिझेलनेही शंभरी गाठली असताना इंधनाच्या दरवाढीला कधी ब्रेक लागणार? असा उत्कट प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 12 दिवसातच पेट्रोलच्या दरात 2.80 रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आली तसेच डिझेलच्या दरात 3.30 रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर हा 110 रुपये प्रति लिटर असून डिझेलने आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच शंभरी गाठत 101 रूपये प्रति लिटर एवढा विक्रमी टप्पा गाठला आहे. ऑक्टोबर महिन्यात इंधन दरवाढीने मात्र कळस गाठला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या इंधनाचे दर वाढल्याने एकूणच परिस्थिती ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून महागाई देखील वाढत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावरही महागाई कमी करण्यात येत नसल्याने सरकारविरोधात नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटताना पाहायला मिळत आहे. तसेच सरकार आता ही दरवाढ रोखण्यासाठी काय प्रयत्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा; वाचा सविस्तर वृत्त

“भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास ही गोष्ट शोभत नाही”

“विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास मिळणं हे ‘भाग्य’ आहे”

“पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी सरकारमधील तीनही पक्ष बदनामीचा कट रचतायेत”

…म्हणून देशात जाणवतोय कोळशाचा तुटवडा, केंद्रानं दिलं उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More