PF withdrawal limit | केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) पैसे काढण्याच्या कमाल मर्यादेत वाढ केली आहे. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आता यापुढे 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकणार आहेत. कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. (PF withdrawal limit )
यापूर्वी कमाल मर्यादा 50 हजार होती. मात्र, केंद्र सरकारने आता नियम बदलला आहे. नवीन नियमानुसार, आता आणखी 50 हजारांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता 1 लाख रुपये काढता येतील. वैयक्तिक गरजांसाठी पीएफ खात्यातून काढावयाच्या रकमेच्या मर्यादेत वाढ करण्यात आली.
पीएफ खात्यातून 1 लाख रुपये काढता येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मला 100 दिवस पूर्ण झाले. यानिमित आयोजित कार्यक्रमात बोलताना कामगार मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. लग्न आणि वैद्यकीय उपचारांसारख्या खर्चासाठी ईपीएफओचे सदस्य त्यांच्या खात्यातील काही रक्कम काढत असतात. मात्र, बऱ्याचवेळा ही आर्थिक गरज मोठी असते. याचा विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कमाल मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचा अनेकांना लाभ होणार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी आणि इतर वैयक्तिक कारणांचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे. (PF withdrawal limit )
लग्न किंवा आजारपणासाठी काढता येणार पैसे
केंद्र सरकारने EPFO बाबत अजून एक नियम बदल केला आहे. ईपीएफओशी संलग्न नसलेल्या कंपन्यांना सरकारी यंत्रणांच्या कक्षेतून वगळण्यात आलंय.काही कंपन्यांना स्वत:च्या सेवानिवृत्ती योजना चालवण्याची मुभा आहे. आता सरकारने या कंपन्यांना EPFO मध्ये सामील होण्याचा पर्याय दिलाय. (PF withdrawal limit )
सुमारे 1 लाख कर्मचारी असणाऱ्या एकूण 17 कंपन्या आहेत. या कंपन्या स्वत:च्या निधीऐवजी ईपीएफओकडं वळणार असतील तर आम्ही संधी देऊ, असं कामगार मंत्री मांडवीय यांनी म्हटलंय. तसेच सरकारची भविष्य निर्वाह निधी योजना चांगली चालली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
News Title : PF withdrawal limit hike
महत्वाच्या बातम्या-
… तर फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणारचं; कोणी दिला थेट इशारा
आज उभयचरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; ‘या’ राशी होणार धनवान
आधारकार्ड वरील नाव बदलायचंय? तर लागतील ही कागदपत्रं
बाप्पा गेले गावी, राज्यात पावसाचं होणार पुन्हा आगमन; कुठे-कुठे बरसणार?
“राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवे”; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य