Phalgun Purnima 2025 | हिंदू धर्मात पौर्णिमेच्या तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा वेगवेगळ्या धार्मिक कार्यांसाठी पवित्र मानली जाते. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला फाल्गुन पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी स्नान, दान आणि विशेष पूजा केल्याने पितरांना शांती मिळते आणि पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. (Phalgun Purnima 2025)
फाल्गुन पौर्णिमा कधी साजरी केली जाणार?
हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी १३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३५ वाजता सुरू होईल आणि १४ मार्च २०२५ रोजी दुपारी १२:२३ वाजता संपेल. उदयतिथीप्रमाणे, फाल्गुन पौर्णिमा १४ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे, तर व्रत १३ मार्च २०२५ रोजी पाळले जाणार आहे.
पितृशांतीसाठी विशेष उपाय
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्याने पूर्वज संतुष्ट होतात आणि घरात सुख-शांती नांदते. तसेच, पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
१. दक्षिण दिशेला चारमुखी दिवा प्रज्वलित करणे
या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला चारमुखी दिवा प्रज्वलित करून पितृस्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
२. अन्नदान करा
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी गरीबांना अन्नदान करावे. तसेच, गाय, कुत्रा आणि कावळ्याला अन्न खायला घालावे.
३. पूर्वजांसाठी प्रार्थना व स्नान
या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करून पितरांसाठी प्रार्थना करावी. हे केल्याने पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते. (Phalgun Purnima 2025)
४. चंद्राला अर्घ्य अर्पण करणे
पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात पांढरी फुले टाकून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे. या उपायामुळे पितृदोष दूर होतो आणि पूर्वज प्रसन्न होतात.
Title : Phalgun Purnima 2025 Remedies for Ancestors Peace