Top News

मत द्यायचंय ‘कमळाला’, द्यायला लावलं ‘पंजा’ला; व्हीडिओ शेअर करत स्मृती इराणींचा आरोप

अमेठी |   काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मतदान केंद्र ताब्यात घ्यायला येत आहेत. ते मतदान केंद्र बळकाविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे.

स्मृती इराणी यांनी एक व्हीडिओ शेअर करत राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका महिलेला मत द्यायचं होतं कमळाला पण त्या महिलेचा हात पकडून तिला बळजबरीने पंजाला मतदान करायला लावले, असा आरोप व्हीडिओमध्ये त्या महिलेने केला आहे. तो व्हीडिओ स्मृती इराणी यांनी शेअर केला आहे.

घडलेली घटना गौरीगंजमधल्या गुजरटोला बुथ नंबर 316 मधील आहे, असं स्मृती इराणी यांनी म्हटलंय.

मतदान केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यावर स्मृती इराणी यांनी जबरदस्तीने काँग्रेसला मतदान करायला लावल्याचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-देशासमोरचे महत्वाचे मुद्दे कोणते??? रायबरेलीच्या महिला म्हणतात…

-‘त्या’ वक्तव्याप्रकरणी मोदीजी देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही- राज ठाकरे

-आता जे मला ट्रोल करत आहेत, तेच माझं काम पाहून कौतुक करतील- रोहित पवार

-पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तुफान राडा; मतदान केंद्राबाहेरच मारामारी!

-पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात; ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या