गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन नंतर दगडाने ठेचलं; पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ
पुणे | मुळचा जालना येथील 30 वर्षीय तरुण पुण्यात शिक्षणासाठी आला असून पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे पीएचडी करत होता. या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. तसेच त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या चेहऱ्याला दगडाने ठेचून काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सुदर्शन हा मुळचा जालना जिल्ह्यातील जाफारबाद तालुक्यातील होता. मात्र शिक्षणासाठी तो पुण्यात आला असून सुतारवाडी भागातील शिवनगर परिसरात तो राहत होता.
पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या चेहऱ्याला दगडाने ठेचून विद्रुप करुन त्याचा मृतदेह सुस येथील खिंडीत टाकून दिला होता. घडलेल्या या प्रकरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या संपुर्ण घटनेची महिती सुदर्शनच्या चुलत भावाने पोलिसांना दिली असून पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हत्येबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! खासगी रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळेल कोरोनावरील लस
मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट, म्हणाले..
…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात
Comments are closed.