देश

“मी कराचीतून बोलतोय, मोदींना मारण्यासाठी माणसं पाठवली आहेत”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यासाठी माणसं पाठवली असल्याचा फोन पाकिस्तानातील कराचीमधून आला असल्याची बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनूपर मधील जितेंद्र नावाच्या व्यक्तीला फोन आला होता.

मी कराचीतून बोलत असून नरेंद्र मोदींना मारण्यासाठी 2 माणसं नेपाळमार्गे पाठवली आहेत, असं फोन करणाऱ्या व्यक्तीनं  फोनवर सांगितलं, असं जितेंद्र यानं म्हटलं आहे.

भारतात पाठवलेल्या माणसांकडे AK-47 आणि बॉम्बदेखील आहेत, असं तो व्यक्ती म्हणाला,असं जितेंद्र यानं पोलिसांना सांगितलं आहे.

दरम्यान, जितेंद्रनं या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदींच्या प्रचाराला येणार 5 हजार परदेशी भारतीय स्वयंसेवकांची फौज

भाषण सुरु असताना मोहन भागवतांवर साधू भडकले, पाहा नेमकं काय घडलं…

हेल्मेट सक्तीविरोधी संतप्त आंदोलकांनी मेधा कुलकर्णींना हुसकावलं

मुख्यमंत्री फडणवीसांना आठवड्यातला आणि महिन्यातला फरकही कळेना! पाहा व्हीडिओ-

गरिब व वंचित जनतेला समर्पित असा अर्थसंकल्प- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या