‘वसुधैव कुटुंबकम’ अंघोळीची गोळीतर्फे छायाचित्र प्रदर्शन

पुणे | हवामान (Weather) बदलाचे पडसाद सामान्य माणसापर्यंत येऊन पोहचले आहे. यावर वेळीच उपाय केले तर वसुधैव कुटुंबकम सत्यात उतरू शकते. उन्हाळयात पडणाऱ्या पावसामुळे हवामान बदलाचे परिणाम सगळ्यांना दिसून येत आहे.

गेली अनेक वर्ष जगभरात हवामान (Weather) बदला संदर्भात बोलले जात आहे. आता हे संकट आपल्या पर्यंत येऊन पोहचले आहे. आज हवामान बदल आणि त्यावरील उपाय म्हणजेच हवामान ठोसा.

छायाचित्रांच्या माध्यमातून अंघोळीची गोळी ही संस्था जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रदर्शन 16 ते 18 एप्रिल दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने ‘वसुधैव कुटुंबकम’ छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनात हवामान बदलाचे परिमाण निसर्गावर कसे होतात छायाचित्रातून दाखवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

1

महत्वाच्या बातम्या-