बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नुसता झगमगाट!!! ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | काँग्रेसचे नेते तसेच महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्याचे व कार्यालयाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नितीन राऊत यांच्या बंगल्याचे फोटो शेअर करून त्या पोस्टमध्ये ‘हे घर आणि कार्यालय म्हणजे आमची तिजोरी रिकामी करून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना आहे’, अशा आशयाचा मजकुर लिहिण्यात आला आहे.

सध्या सोशल मीडियावर नितीन राऊत यांचे कार्यालय आणि बंगल्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याबरोबरच गरीब शेतकऱ्यांची वीज कापतात, कोरोना योद्ध्यांना पगार देत नाहीत आणि आपल्या ऑफिस आणि बंगल्यावर पाहा कसे पैसे उधळतात! असा संदेशही या फोटो सोबत व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारकडे पैसे नाहीत असं सांगितलं होतं. तसेच थकबाकीदार वीज ग्राहकांची विज कापण्यासाठी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. ऊर्जा मंत्र्यांच्या या आदेशावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

लॉकडाऊनकाळात 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची घोषणा देऊन परत मागे फिरल्याने भाजपने नितीन राऊत यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर त्यांनी आपण असं वक्तव्य केलंच नाही तर विज बिल माफीसाठी समिती बनवल्याचं सांगितलं होतं. असं स्पष्टीकरण दिलं. सध्या भाजप नितीन राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच नितीन राऊत यांच्या विमानप्रवासावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी सरकारी तिजोरीतील पैशांचा वापर नितीन राऊत यांनी खाजगी कामासाठी केल्याबद्दल त्यांच्यावर कलम 406 व 409 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात केला होता.

ऊर्जा मंत्र्यांच्या आदेशावरून महाराष्ट्रात थकबाकीदार ग्राहकांची वीज कापण्याची मोहीम जोरदार सुरू करण्यात आली. एकीकडे वीज कापल्यामुळे अंधारात असलेला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस, तर दुसरीकडे आलिशान आणि डोळे दिपवणारं मंत्र्यांचं कार्यालय, एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जाणारा पैसा नेमका कुठून येतो? असा प्रश्नही विरोधकांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे. यासर्व प्रकरणामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत सध्या चांगलेच चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय.

थोडक्यात बातम्या –

‘मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा”

महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?, सोनू सूद म्हणाला…

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मंत्रिपद धोक्यात

‘राज्यात भाजपचं सरकार आल्यावर….’; नरेंद्र मोदींनी बंगालच्या जनतेला दिला शब्द

भारीच की! बीएम डब्लूची इलेक्ट्राॅनिक कार लवकरच लाँच, एकदाच करा चार्ज अन्….

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More