मुंबई | आयपीएलच्या (IPL) यंदाच्या सिझनला जल्लोषात सुरूवात झाली आहे. काल चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) असा रंजक सामना पाहायला मिळाला. शेवटच्या क्रमांकावर असलेल्या सीएसकेने आरसीबीचा दारूण पराभव केला.
शेवटपर्यंत रंजक ठरलेल्या या सामन्यापेक्षा सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. आपली आवडत्या टिमला सपोर्ट करण्यासाठी अनेक चाहते मैदानात येऊन त्यांचा उत्साह वाढवतात. आरसीबीची अशीच एक चाहती हातात भन्नाट पोस्टर घेऊन सामना बघायला पोहोचली.
कालच्या सामन्यातील या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ‘जोपर्यंत आरसीबी जिंकत नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही’, असं पोस्टर हातात घेतलेल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तरूणीच्या हातातील या पोस्टरने मॅच दरम्यान सर्वांचच लक्ष वेधलं.
दरम्यान, आरसीबी संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही. यंदाच्या सिझनमध्येही आरसीबीकडे सर्व दिग्गज खेळाडू आहेत. फाफ डू प्लेसीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने या सिझनमध्ये 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे यंदा तरी आरसीबी विजयी होईल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
Focus on the poster guys holding 🤣🤣#CSKvsRCB pic.twitter.com/sXYr7Gnj2s
— Rishabh Srivastava (@AskRishabh) April 12, 2022
थोडक्यात बातम्या-
जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर, म्हणाले…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! CNGच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ
मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, रूग्णालयात दाखल
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस; स्कायमेटचा अंदाज
“3 तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा…”; राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम
Comments are closed.