बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोड समर्थकांकडून गलिच्छ प्रकार सुरु, चित्रा वाघ यांना केलं जातंय टार्गेट!

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. या प्रकरणाच्या संंबंधित सोशल माध्यमांवर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरत थेट संजय राठोड यांच्यावर पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र चित्रा वाघ यांच्या समर्थकांकडून गलिच्छ प्रकार सुरू झाल्याचं दिसत आहे.

सोशल माध्यमांवर संजय राठोड यांचे आणि पूजा चव्हाणचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यासोबतच पूजाच्या लॅपटॉपमध्ये राठोडांचा एक व्हिडीओ सापडल्याचं बोललं जात आहे. तर आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पूजा एका गबरूशेठ नावाच्या इसमाशी संवाद साधत आहे. ज्यानुसार, तुमचा नंबर मी रिजेक्ट लिस्टमधून नंबर काढलाय, आपका हुकूम सर आँखों पर असं पूजा म्हणते त्यावर गबरूशेठ थँक्यू थँक्यू’! असं उत्तर देतो. त्यामुळे संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र दुसरीकडे संजय राठोड समर्थकांकडून चित्रा वाघ यांची ऑनलाईन बदनामी सुरू करण्यात आली आहे.

चित्रा वाघ यांच्या पतीसोबतचा फोटो एडिट करत त्या जागी संजय राठोड यांचा फोटो लावला आहे. चित्रा वाघ यांचा हा फोटो सोशल माध्यमांवर पसरवला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचा फोटो माध्यमांवर पसरवणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत चर्चा केली. त्यासोबतच पूजाने ज्या बाल्कनीतून आत्महत्या केली तिथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत संजय राठोडचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र आता यावरून चित्रा वाघ यांना टार्गेट केलं जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….

पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

‘…तर 1 मार्च पासून दूध 100 रूपये प्रतिलिटर दराने विकणार’; शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा

‘ये बंगाल की प्रमुख जनता है और….’; भाजपमध्येही होत आहे ‘पावरी’, पाहा व्हिडीओ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि शरद पवारांकडून अपेक्षा – विनोद तावडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More