बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊन इफेक्ट, उत्तर प्रदेशातून दिसतायत हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा

सहारनपूर | कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन करण्यात आलं. लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसाय बंद आहे. पण त्याचवेळी लॉकडाउनमुळे निर्सगामध्ये झालेले काही चांगले बदलही दिसून येत आहेत.

उत्तर प्रदेशात नागरिकांनी काही पर्वतांचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. भारतीय वन खात्यातील अधिकारी रमेश पांडे यांनी हिमालयाचे फोटो टि्वटरवर शेअर केलेत. त्यानंतर हे फोटो आता व्हायरल झाले आहेत.

लॉकडाउन आणि अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे हवेचा दर्जा सुधारला आहे. वसंत विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या दुष्यंत यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या घरातून हे फोटो काढले, अशी माहिती रमेश पांडे यांनी त्यांच्या टि्वटर हँडलवर दिली आहे.

भारतीय वन खात्याचे दुसरे अधिकारी परवीन कासवान यांनी सुद्धा हिमालयीन पर्वतरांगांचे फोटो शेअर केले आहेत. सहारनपूरपासून या पर्वतरांगा 150 ते 200 किलोमीटर अंतरावर आहेत असं परवीन कासवान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

तळीरामांना मोठा दिलासा; दारुची दुकानं सुरू होणार पण…

महाराष्ट्र दिनी केंद्राचा महाराष्ट्राला धक्का; आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवलं

महत्वाच्या बातम्या-

राज्यात 24 तासात 1008 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 11 हजार 500 च्याही वर

पुण्यातून कुणाला जाता येणार गावी?; कसा कराल अर्ज??? जाणून घ्या सर्व माहिती

पुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More