बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरीरसंबंध ठेवताना फोटो काढले अन्… पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक गुन्हे घडत असल्याचं समोर येत आहे. त्यातच आणखी एक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आपल्या सोबत काम करणाऱ्या एका महिलेचे अश्लील फोटो तिच्याच नातेवाईकांना पाठवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीची एक महिला काही दिवसांपूर्वी कुटुंबियांबरोबर पुण्यात कंपनीमध्ये काम करण्यासाठी आली. कंपनीमध्येच काम करणाऱ्या सागर सुनिल मोरे या तरुणाशी तिची ओळख झाली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमामध्ये होत गेलं आणि त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

शारीरिक संबंधाच्या वेळी सागर मोरे याने त्या महिलेचे अश्लिल फोटो तिच्या संमतीशिवाय काढले आणि त्यानंतर ते तिच्या नातेवाईकांना पाठवून समाजात त्या महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात या महिलेने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार या तरुणावर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील हडपसर भागामध्ये राहणाऱ्या सागर सुनिल मोरे या तरुणावर संबंधित पीडित महिलेची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अजून अटक करण्यात आलेली नाही. शारीरिक संबंधावेळी अश्लील फोटो काढून ते तरूणीच्या नातेवाईकांना पाठवून त्या मुलाने पीडित महिलेची बदनामी केली. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

पुण्यात पेट्रोलने गाठली शंभरी; इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री

रमजान ईदनिमित्त गृह विभागाकडून ‘या’ मार्गदर्शक सुचना जारी 

‘सोनिया गांधी सामनाची दखल घेतात’; संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे

खुशखबर! 2 ते 18 वर्षांच्या मुलांनाही आता मिळणार कोरोनाची ‘ही’ लस

कोरोना रूग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करणाऱ्या डाॅक्टराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More