बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रात्री 11.30 ते सकाळी 6 व्हॉट्सअप बंद राहणार?; पीआयबीकडून मोठं स्पष्टीकरण

नवी दिल्ली |  काही दिवसांपूर्वी  इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक अचानक डाउन झाले होते. काही तांत्रिक कारणांमुळे या ॲप्सची सेवा खंडीत करण्यात आली होती. मात्र तोपर्यंत अनेकजण बैचेन झाल्याचं पाहायला मिळालं होतं. व्हॉट्सॲप अचानक बंद का पडलं असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनेकांनी तर हे ॲप चालू व्हावेत यासाठी हे ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करणे, मोबाईल स्विच ऑफ करून पुन्हा ऑन करण्यासारखे प्रयत्नदेखील केेले होते. मात्र आता खरंच व्हॉट्सॲप बंद होणार, असा मेसेज व्हायरल झाला आहे. हा मेसेज खरा की खोटा याची शहानिशा न करता अनेकजण तो पुढं पाठवत असल्यानं या मेसेजचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.

भारत सरकारने व्हॉट्सॲप बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड  केला जात आहे. या मेसेजमध्ये फेसबुकची मालकी असलेली व्हॉट्सॲप रात्री 11:30 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्यात येईल. शिवाय हा मेसेज अधिक लोकांना फॉरवर्ड न केल्यास वापरकर्त्याचं अकाउंट निष्क्रिय करण्यात येईल. असा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र आता पीआयबीने याबाबत खुलासा केला आहे.

सरकारद्वारा चालवल्या जाणाऱ्या पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरोम्हणजे पीबीआयने ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. ही बातमी खोटी असून सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही आणि वापरकर्त्यांनी अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही बातमी खोटी असल्याचं सिद्ध झालं आहे.

पीआयबीने ट्वीटद्वारे हा खुलासा केला आहे. याआधी व्हॉट्सॲप आणि इतर ॲप अचानक बंद झाल्याने कंपनीचं कोट्यावधीचं नुकसान झालं होतं. शिवाय वापरकर्त्यांनाही त्यामुळे मेसेज पाठविण्यात आणि इतर अनेक महत्त्वाच्या कामात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा आता व्हॉट्सॲप बंद होण्याची ही खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या मनातली भीती वाढली होती. पंरतु पीबीआयने केलेल्या खुलाशामुळे ती भीती संपली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“फडणवीस मुख्यमंत्री असताना खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंचा पुन्हा आक्रमक पवित्रा

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, वाचा आकडेवारी

संजय राऊतांचा बैठकींचा सपाटा; पुण्यात मोर्चेबांधणीला केली सुरूवात

या भाजपच्या नेत्यांवरील आरोपाचं पुढे काय झालं? राष्ट्रवादीचा पोस्टर्समधून किरीट सोमय्यांना सवाल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More