बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पिंपरी-चिंचवडमधल्या PSI ला तब्बल इतक्या लाखांची लाच घेताना अटक!

पिंपरी चिंचवड  |  पोलिस उपनिरीक्षक फारूक सोलापुरे यांना पाच लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

फारूक सोलापुरे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चिखली पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. सोलापुरे यांना साने चौकीत नेमणूक देण्यात आली होती.

तक्रारदारांनी बांधकाम केलेल्या बिल्डींगमधील सहा फ्लॅट विकले होते. ते फ्लॅट विकत घेतलेल्यांकडून काही पैसे येणे बाकी होते. तक्रारदारांनी पैसे मिळावेत म्हणून चिखली पोलीस ठाण्यात 29 तारखेला तक्रार दिली होती.

यासंदर्भातील चौकशीचं काम सोलापुरे यांच्याकडे होतं. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठी पाच लाख रूपयांची लाच सोलापुरे यांनी तक्रारदाराला मागितली होती. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून ही सगळी हकीकत कळवली. त्यानुसार सापळा रचून एसीबीने ही कारवाई केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

गुड न्यूज! अखेर कोरोनावर औषध सापडलं, डीजीसीआयकडूनही मिळाली परवानगी

नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर निघून गेले

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सोनाक्षीने ट्विटरला रामराम ठोकत लिहिली ही पोस्ट!

भंगार गोळा करणाऱ्या बापाचा लेक झाला नायब तहसीलदार, बापाचे आनंदाश्रू थांबेना…!

बाबा, तुम्ही सोबत असल्यावर माझ्या अंगात हत्तीचं बळ येतं; खडसेंच्या लेकीची भावूक पोस्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More