पुणे महाराष्ट्र

पुणेकरांनी भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करुन घ्यावी- अजित पवार

पुणे | पुणे आणि पिंपरी शहरात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. सोमवार 13 जुलै मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होईल. लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले..

पुणेकरांनी भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करुन घ्यावी. आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या सेवाच सुरु राहतील.
इतर कुठलीही अ‍ॅक्टिव्हिटी सुरु राहणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

22 गावांमध्ये कोरोनाच्या केसेस अधिक आहेत. त्यात आणखी गावे समाविष्ट होतील. एखाद्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण असतील, तर पूर्ण लॉकडाऊन करणार, मात्र उद्योग पूर्ण बंद करायचे नाहीत, असं अजित पवार यांनी सांगितलंय.

18 जुलैनंतर काय सुरु राहील त्याबाबत दोन दिवसात नवीन सूचना देण्यात येईल. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ऑनलाइन पास दिला जाईल, असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

‘मी समाधानी, मात्र दुबेची चौकशी झाली असती तर…’; शहीद पोलिसाच्या पत्नीची प्रतिक्रिया

“…म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते”

कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर…- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या