बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनातून बरे झालेल्या नर्सचं ढोल ताशा लावून स्वागत; पिंपरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड |  कोरोनातून बऱ्या झालेल्या नर्सचं जंगी स्वागत करणं राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्याविरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगला कदम यांच्यासह आणखी 4 जणांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं महत्त्वाचं बनलं आहे. तसंच शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं सक्तीचं आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग केलेला आहे तसंच अनावश्यक कारणांसाठी गर्दी जमवल्याचा आरोप करत निगडी पोलिसांनी कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या नर्सचं घरी आगमन होत असताना मंगला कदम यांनी ढोल-ताशा लावत आणि पुष्पवृष्टी करत त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी आजूबाजूला नागरिकांचा घोळका दिसत होता. यावेळी त्यांच्याकडून नियमांचं पालन न झाल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कोरोनातून बऱ्या झालेली नर्स ह्या पुण्यातल्या ससून रूग्णालयात कार्यरत होत्या. सेवेत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू उपचारानंतर त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल”

पुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार!

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा?; महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत उद्धव राज्यपालांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या योगदानाचा भारताला अभिमान; महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं मराठमोळं ट्विट!

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी- राजेश टोपे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More