Top News पुणे

फोन लावायचा होता आढळरावांना लागला अजितदादांना, ‘दादां’नी केलं झटक्यात काम!

पुणे | अजित पवार म्हणजे आक्रमक स्वभाव आणि झटपट निर्णय हे आपण अनेकदा अनुभवलं आहे याचाच प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे. युवासेनेचे शिरुर तालुका प्रमुख संजय पवार यांचं काम एका फोनसरशी झालं.

विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ‘दादा’ यांनी फोन न उचलल्यामुळे अजित पवारांना फोन लावला आणि संजय पवार यांचं काम पुर्ण झालं.

शेतीची कामे सुरु असताना पेट्रोल पंप चालक डिझेल देत नाहीत, अशी तक्रार करणारा फोन संजय पवार यांनी अजित पवारांना केला. त्यावर लगेचच ‘कोण देत नाही डिझेल? दे बरं फोन त्याला’ अशी आवाजातील जरब अजितदादांनी दाखवली आणि पेट्रोलपंप चालकांनी गपगुमान डिझेल दिलं.

दरम्यान, ज्वारी, गहू, हरभरा ही पीके काढणीला आली आहेत. पीकांच्या मळणीसाठीच्या यंत्राचा वापर करण्यासाठी इंधनाची गरज भासते. मात्र पंतप्रधानांनी केलेल्या लॉकडाऊनमध्ये  सूचना केल्याप्रमाणे जिल्ह्यातील पेट्रोलपंप बंद केले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे, अर्थव्यवस्थेवर याचा दीडवर्ष परिणाम होणार”

लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवार म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

सर्व कर्जाचे हफ्ते 3 महिने स्थगित; आरबीआयचा मोठा निर्णय

नितीन गडकरींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली नवी जबाबदारी

अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका; RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या मोठ्या घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या