बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात 81 टक्के नागरिकांना झाला कोरोना; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर

पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या तीन महिन्यात झपाट्याने वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू आता आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच नव्या डेल्टा प्लस या विषाणूच्या प्रकाराने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले.

पिंपरी-चिंचवडमधून आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून शहरातील तब्बल 81 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था आणि वैद्यकीय विभागाने सर्वेक्षण केलं होतं.

दरम्यान, 10 हजार नागरिकांपैकी 8 हजार 207 नागरिकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 81.40 टक्के  नागरिकांना कोरोना होऊन गेला असल्याचे निष्कर्ष समोर आले आहे. तसेच गावठाण भागातील 84.5 टक्के नागरिकांना कोरूना होऊन गेला असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

सिरो सर्वेक्षणातून समोर आलेल्या या माहितीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 81 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला असल्याचं स्पष्ट होत आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा विषाणू महाराष्ट्रात डोकं वर काढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना नेमका कधी आटोक्यात येणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

थोडक्यात बातम्या

ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत, ठाकरे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट”

 

एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही- महादेव जानकर

 

चिंताजनक! रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ‘इतकी’ मुलं कोरोनाच्या विळख्यात

 

ह्रदयद्रावक! 12 दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

 

‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ…’; राऊतांचं सूचक ट्विट

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More