Ladki Bahin Yojana l महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र आता राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलं होत. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून महिलांना 2100 रुपये मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
‘या’ महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही? :
दरम्यान, या योजनेला पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंववड शहरातून देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. मात्र पिंपरी-चिंववडमधून तब्बल 4 लाख 32 हजार 890 अर्ज लाडक्या बहिणींनी भरला होता. मात्र त्यापैकी 3 लाख 89 हजार 920 महिला या योजनेसाठी पात्र देखील ठरल्या आहे. तसेच महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम देखील मिळाली आहे.
मात्र आता पिंपरी-चिंववड शहरातून तब्बल 42 हजार 486 अर्ज बाद ठरण्यात आले आहेत. त्यामुळे आता 42 हजार 486 अर्ज बाद झाले आहेत त्यांना आता डिसेंबर महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.
Ladki Bahin Yojana l अर्ज बाद का ठरले? :
राज्यातील अवैध ठरलेल्या अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे नसणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील महिला अपात्र ठरले आहेत. याशिवाय मर्यादेपेक्षा उत्पन्न जास्त, तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांचे अर्ज आणि मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे या कारणांमुळे हे अर्ज बाद ठरण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
News Title – pimpri chinchwad city became eligible for ladaki bahin yojana
महत्त्वाच्या बातम्या :
ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट, ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार!
हिवाळ्यात हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? अशाप्रकारे काळजी घ्या
वर्षाच्या शेवटी RBI चा सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का!
फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी?, मोठी अपडेट समोर
शपथविधी होताच वाहनचालकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त?