पत्नीच्या दारु आणि शाॅपिंगच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या

पुणे | पतीला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण पत्नीला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांंनी चिखली पोलिस स्थानकात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जय देविदास तेलवानी (35) असं मृत पतीचे नाव आहे. तर तृप्ती जय तेलवानी असं आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या महिलेचं नाव आहे. त्यांना एक 5 वर्षाचा मुलगा आहे.

तृप्तीला दारु आणि शाॅपिंगच व्यसन होतं. पैश्यासाठी ती नेहमी जयकडे तगादा लावायची. पैसे न दिल्यास ती त्याला मारहाण करायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, जय काही दिवसापासून मानसिक तणावाखाली आला होता. शेवटी छळाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी

-निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार

-बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष-बुलंदशहर हिंसाचाराचा मास्टरमाईंड गजाआड

-आर्चीनं कमावली झीरो फिगर; नवं रुप तुम्ही पाहिलं का???

-गोरक्षक आहेत आणि माणसं मारत आहेत; जितेंद्र आव्हाड संतापले