बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, जाणून घ्या आकडेवारी

पुणे | महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले आहे. वीकेंड लॉकडाऊनसह कडक संचारबंदीचे आदेश संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहेत. या व्यतिरिक्त अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला होता. त्यातच आता पिंपरी-चिंचवडमधून दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णवाढीपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पसरलं आहे.

मागच्या 24 तासात पिंपरी-चिंचवडमध्ये 1134 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल 1965 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी येथे जम्बो कोव्हिड सेंटर देखील पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं होतं.

पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत 2 लाख 31 हजार 357 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत तब्बल 2 लाख 6 हजार 988 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहे. त्याबरोबरच आतापर्यंत 3 हजार 378 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या –

आंतरजिल्हा प्रवासासाठी आले लाखात अर्ज; कारण वाचून पोलिसांनी तब्बल एवढे अर्ज फेटाळले

“रूग्णांना मदत करण्यास अपयश आलं तर, रात्र-रात्र झोप येत नाही”

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये रमजान ईदनिमित्त 2 दिवस खरेदी करण्याची सूट

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More