नगरसेवकांना ड्रेसकोड, पिंपरीत सत्ताधारी भाजपची खिल्ली

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवकांना ड्रेसकोड आणि अधिकाऱ्यांना ब्लेझर देण्याचा विषय नुकताच मंजूर करण्यात आला. यावरुन विरोधकांकडून सत्ताधारी भाजपची खिल्ली उडवली जातेय.

पालिकेत प्रथमच निवडून आलेल्या भाजपकडून उधळपट्टी आणि पोरखेळ सुरु असल्याची टीका विरोधकांनी केलीय. 

माजी पालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अधिकाऱ्यांना ड्रेसकोड अनिवार्य केला होता. मात्र त्यांच्यात निर्णय राबवण्याची धमक होती. नंतरच्या आयुक्तांमुळे या निर्णयाची ऐसीतैसी झाल्याचं बोललं जातंय.