Suicide l पिंपरी (Pimpri) परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात (College) इंजिनिअरिंगच्या (Engineering) तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, पण पीडित मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मैत्रिणीला पाठवलेल्या मेसेजमुळे (Message) आत्महत्येचे कारण समोर आले आहे.
सहिती रेड्डीची आत्महत्या :
सहिती रेड्डी (Sahiti Reddy) (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इंजिनिअरिंगच्या (Engineering) तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने 5 जानेवारीला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी (Wakad Police) घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु, आता वर्गमित्राच्या त्रासातून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
प्रणव राजेंद्र डोंगरे (Pranav Rajendra Dongre) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे मागील काही दिवसांपासून सहितीसोबत (Sahiti) प्रेमसंबंध होते. याचा फायदा घेऊन प्रणवने (Pranav) पीडितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.
याच त्रासातून तिने 5 जानेवारीला 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या मैत्रिणीला एक मेसेज (Message) पाठवला होता, ज्यात तिने मोबाईलचा (Mobile) पासवर्ड (Password) आणि सोसायटीत (Society) राहणाऱ्या काही मित्रांचे नंबर पाठवले होते.
Suicide l व्हॉइस रेकॉर्डिंगमधून खुलासा :
मैत्रिणीने सहितीच्या (Sahiti) कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. कुटुंबियांनी सहितीचा मोबाईल फोन (Mobile Phone) अनलॉक (Unlock) केला. त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव (Pranav), आई-वडील आणि सर्वांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग (Voice Recording) ठेवले होते. यात तिने आरोपी प्रणवच्या (Pranav) त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. या प्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (Kalugotala Venkata Siva Reddy) (वय 54, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रणव राजेंद्र डोंगरेला (Pranav Rajendra Dongre) (वय 20, रा. आकुर्डी) अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.