बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पिंपरीच्या पोलीस आयुक्तांनी केलं वेशांतर, बनले जमालखान कमालखान पठाण अन्…

पुणे | पोलीस वेशांतर करून गुंडांना पकडतात किंवा एखाद्या ठिकाणी रेड टाकतात हे आपण सिनेमात पाहिलं असेल. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये असं प्रत्यक्षात घडलं आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री चक्क वेशांतर करून मिया जमालखान कमालखान पठाण बनले होते. तर त्यांच्यासोबत मियाची बिवी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यासुध्दा वेशांतर करून होत्या.

कृष्ण प्रकाश यांनी तीन ठिकाणी छापे टाकले यामध्ये पहिला छापा हा 12.15 वाजता पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये, यावेळी त्यांनी आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल 8000 रुपये सांगितले, अशी तक्रार घेऊन ते आले. ‘रुग्णवाहिकावाला आम्हाला लूटतोय, तुम्ही तक्रार दाखल करून घ्या, असा आग्राह या जोडीने धरला होता. त्यावेळी हे आमचे काम नाही, म्हणून पोलिसांनी टाळाटाळ केली मग कृष्ण प्रकाश यांनी मास्क काढून त्यांना आपली ओळख सांगितली.

दुसरा छापा रात्री 1.30 वाजता हिंजवडी पोलीस स्टेशन आणि नंतर मध्यरात्री 2 वाजता वाकड चौकीवर झाला. आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो, परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला कंबरेत लाथा घातल्या. झटापटही झाली आणि त्यात एकाचा मोबाईल हातात आला, अशी गंभीर तक्रार हिंजवडी पोलिसांना त्यांनी दिली.

दरम्यान, कामावर असलेल्या पोलिसांनी गांभीर्याने त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि कच्ची फिर्याद तयार केली. आपण वरिष्ठांना बोलावतो, ते इतक्यात येतील तोपर्यंत थांबण्याची विनंतीही केली. त्यानंतर प्रकाश यांनी आपली ओळख सांगितली. यावर बोलताना, वाकड आणि हिंजवडीत खूप चांगला अनुभव आला मात्र पिंपरीत वाईट अनुभव होता. आपला स्टाफ खरोखर कसे काम करतो, तकारदारांना कशी वागणूक देतो याची तपासणी करण्यासाठी आपण यापुढेही अशाच प्रकारे अचानक धाडी टाकणार असल्याचं कृष्ण प्रकाश म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“…अन्यथा एकाही मराठा आमदार, खासदार आणि मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही”

किती ती क्रूरता! गरीब भाजी विक्रेत्याच्या टोपलीवर पोलिसाचा लाथ मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

#सकारात्मक_बातमी | दोन वेळा बायपास झालेल्या 74 वर्षीय पैलवानाची कोरोनावर यशस्वी मात

“पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका”

अखेरपर्यंत ICU बेड मिळालाच नाही; NSG ग्रूप कमांडरचा रस्त्यातच मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More