बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुळशी पॅटर्नची नागपुरात पुनरावृत्ती; भर रस्त्यावर ‘लेडी डॉन’ची पळूपळून हत्या

नागपूर | राज्याच्या विविध शहरांमध्ये सध्या कोरोनाचा प्रकोप पहायला मिळतोय. सरकारनं लॉकडाऊन लावलं आहे, मात्र अशा परिस्थितीतही गुंडगिरी काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. आता नागपूरच्या लेडी डॉनची भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. नागपूर शहरातील तांडापेठेत भरचौकात ही हत्या करण्यात आली आहे, पिंकी वर्मा असं हत्या झालेल्या लेडी डॉनचं नाव आहे.

सोमवारी दुपारी पिंकीचा आरोपींसोबत वाद झाला होता. सोमवारी संध्याकाळी पाचपावली भागात पिंकी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होती. लोकांच्या दारात, घरात व मोहल्ल्याच्या रस्त्याने पळत होती. तर गुंड चाकू घेऊन तिच्या पाठीमागे धावत होते. ती किंचाळत होती. लोकांना मदतीची याचिका करत होती, पण कोणी तिच्या मदतीला धावून आले नाही. गुंड तिच्या शरीरावर चाकूने सपासफ वार करत तिचा पाठलाग करत होते.

शेवटचा प्रयत्न म्हणून ती स्वतःच्या घरात शिरली. गुंडांनी तिथे पण तिचा पाठलाग सोडला नाही. आरोपींनी तिच्यावर अनेक वार केले. जखमेतून निघणाऱ्या रक्ताने ती भिजली होती, चाकूच्या वाराने तिचे कपडे देखील फाटले होते. जास्त रक्तस्राव झाल्यानं ती शेवटी खाली कोसळली. पिंकी वर्माची स्वतःची गॅंग होती. त्या जोरावर ती अवैध धंदे चालवत होती. वैध धंदे करणाऱ्या इतर व्यक्तींना पिंकी शर्मा धमक्या देत असल्याचं बोललं जात आहे. याच कारणावरुन आरोपींनी तिची हत्या केल्याचा आरोप केला गेला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दखल घेतली. पोलिसांना आरोपीची ओळख पटली असून पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत. मुळशी पॅटर्न चित्रपटात घडावा तसा हा घटनाक्रम होता. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू

चेन्नईच्या विजयानंतर जडेजाचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

“देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

…म्हणून उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More