बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Pitru Paksha 2022: जाणून घ्या कधी सुरु होतोय पितृपक्ष, 15 दिवसांची संपूर्ण माहिती

मुंबई | पितृपक्ष (Pitru Paksha) म्हणजेच माळाचा महिना. याला महालय सुद्धा म्हणलं जातं. पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला. त्या तिथीला श्राद्ध केले जाते. ज्या निमित्ताने आपण आपल्या इतर पूर्वजांचे स्मरण करतो.

हिंदू धर्मात (Hinduism) पितृपक्षाला अधिक महत्व दिलं जातं. ही विधी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी केली जाते. त्यांचे अशिर्वाद घेतले जातात. यज्ञ करुन कावळ्यांना पाणी आणि अन्न खाण्यास दिले जाते.

श्राद्धाच्या दिवशी पितरांचे स्मरण केले जाते. या दिवशी आपले पूर्वज(ancestors) मोक्षासाठी फिरत असतात.  त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबावर सदैव राहोत अशी कामना केली जाते.

या दिवसात केलं जाणारं दान अधिक पवित्र (sacred) मानलं जातं. आपल्या पूर्वजांचे आशिर्वाद अशाप्रकारे घेणं खूप भाग्याचं समजलं जातं.

भारतात दरवर्षी पितृपक्ष केला जातो. हिंदू धर्मानुसार चातुर्मासात पितृपक्ष असतो. असंही मानलं जातं की त्यादिवशी यम आपल्या पूर्वांजाना कुटुंबाला पाहण्यासाठी पृथ्वीवर पाठवातात. त्यादिवशी करण्यात आलेल्या पूजेने आणि दानाने (with charity) आपले पूर्वज मुक्त होतात आणि पुन्हा आपल्या जागी निघून जातात.

हा महिना किंवा हा शोककाळ (mourning period) हा शोक काळ कृष्ण पक्ष किंवा अश्विनी महिन्यातील पौर्णिमा तिथी किंवा पौर्णिमा या दिवशी सुरू होतो.

आपल्याला पितृपक्षाचे महत्व समजले आता या महिन्यात पितृपक्षाचे दिवस जाणून घेऊयात.

या वर्षी 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर (September) पर्यंत पितृपक्ष असणार आहे. आश्विन कृष्ण प्रतिदेला पहिले श्राद्ध असणार आहे. त्यादिवसापासून सुरुवात होईल..

दुसरे श्राद्ध 11 तर सोमवार, 12 सप्टेंबर रोजी तृतीया श्राद्ध (Shraddha) आहे. 14 सप्टेंबरला चतुर्थी असून महाभरणी आहे.

15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अनुक्रमे पंचमी ते दशमी आहे.  21 ला एकादशी तर 22 ला द्वादशी आहे. 23 ला त्रयोदशी आणि माघ श्राद्ध आहे. 24 सप्टेंबर शनिवारी(on saturday) चतृर्दशी श्राद्ध आहे. 25 ला सर्वपित्री अमावस्या (Sarvapitri Amavasya) आहे. या दिवसाला पितृपक्षात अधिक महत्व दिलं जातं.

थोडक्यात बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More