Pitru Paksha 2024 | यावर्षी 18 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे. पितृ पक्षातील हे 15 दिवस हिंदू धर्मात महत्वाचे असतात. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण, अशा धार्मिक विधी केल्या जातात. आज 23 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. आज षष्ठी तिथीचे श्राद्ध केले जाईल. (Pitru Paksha 2024)
या काळात पितर नाराज असतील तर पितृ दोष लागतो असं म्हटलं जातं. पितृ पक्षात जर तुमच्यासोबत काही अशुभ घटना घडत असतील तर सावध राहा. जर पितर नाराज झाले तर घरात काही अशुभ घटना घडू लागतात. यासाठी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतात.
पितर नाराज असतील तर करा ‘हे’ उपाय
दान आणि पुण्यदान करा : एखाद्या आकस्मिक दुर्घटनेचे शिकार झालात, किंवा अचानक एखादा आजार उद्भभवून पैसा बरबाद झाला तर तुम्हाला पितृ दोष आहे असं समजा. तुमच्यासोबत असं काही होत असेल तर पितरांच्या शांतीसाठी दान आणि पुण्यदान करा.
अन्न, जल आणि वस्त्रदान करा : घरात भांडण सुरू असतील. पती-पत्नीतील वाद थांबत नसतील तर घरातील या क्लेशाला पितृ दोष कारणीभूत असते. तसेच, जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात जर पितरांना रडताना पाहिलं असेल तर ही फार अशुभ घटना मानली जाते. जर तुम्हालाही अशी स्वप्नं पडत असतील तर याचा अर्थ तुमचे पितर तुमच्यावर नाराज आहेत. यासाठी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात पितरांच्या नावाने अन्न, जल आणि वस्त्रदान करा. (Pitru Paksha 2024)
मंदिराच्या प्रांगणात पिंपळाचं झाड लावा : त्याचबरोबर पितृ पक्षाच्या आधी घरात अचानक झाड उगवणं, तुळस सुखणे असे अशुभ संकेत मानले जातात. या घटना पितरांची नाराजी दर्शवतात. त्यामुळे धन, सुख, समृद्धी आणि मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. तसेच पितृ क्रोधित असतील तर घरात होणाऱ्या सर्व शुभ कार्यांवर विघ्न येते. यासाठी एखाद्या मंदिराच्या प्रांगणात पिंपळाचं झाड लावा आणि त्याची पूजा करा.
तेलाचा दिवा लावा : तुम्हाला झोपेत अचानक भीती वाटत असेल तर हा एका अर्थाने पितृदोष असू शकतो. यासाठी रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावा. तुम्ही हे प्रत्येक दिवशी करू शकता. म्हणजेच तुम्ही हे वर्षभर करू शकता. (Pitru Paksha 2024)
News Title : Pitru Paksha 2024
महत्वाच्या बातम्या –
अजितदादांची गरज संपली, भाजपकडून आता काटा काढण्याचा प्लॅन?; राऊत स्पष्टच बोलले
आता थेट मुंबईच पाणी बंद करणार! अजितदादाच्या ‘या’ आमदाराने सरकारला दिला इशारा?
..तर असं झालं नाही तर भाजप, शिंदे गट अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढणार?
घराबाहेर आल्यावर अरबाजने निक्कीसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाला…
नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं भाग्य उजळणार