बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा, अन्…”

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांची कमतरता जाणवू लागली आहे. यावरून राजकारण तापलं असून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.

केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. यावरून केंद्रीय पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.  उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, अशी घणाघाती टीका पियुष गोयल यांनी केली आहे. तसेच आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आल्याचा दावा गोयल यांनी केला आहे.

हाराष्ट्रत सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या लोकांसाठी योग्य ते काम करत आहे. महाराष्ट्रातील नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारीचे योग्य पद्धतीने पालन करत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्य पाळून माझे राज्य, माझी जबाबदारी हे तत्व पाळण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत गोयल यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झाले. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. आताच्या घडीला आपल्या क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत आहोत, असं गोयल यांनी सांगितलंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोना रूग्णांना मोठा दिलासा; रेमडेसिवीर संदर्भात केंद्र सरकारने केली मोठी घोषणा

“कुंभमेळ्याहून परतणारे भाविक प्रसाद म्हणून कोरोना घेऊन येतील”

प्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला प्रियकर, केले अत्यंत धक्कादायक कारनामे

15 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; पुुण्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोनाने मृत्यू

महाराष्ट्राकडून मी तुम्हाला विनंती करतो, राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा- जितेंद्र आव्हाड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More