Loading...

पत्रकाराचा अर्थव्यवस्थेवर प्रश्न अन् वाणिज्यमंत्र्यांचं भलतंच उत्तर!; सोशल मिडीयावर ट्रोल

नवी दिल्ली |  गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी आइन्स्टाइनला गणिताची मदत झाली नाही, असं वक्तव्य वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एक बैठकीत केलं. आणि त्यानंतर गोयल यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवायला सुरू झाली आहे.

टीव्हीवर दिसणाऱ्या आकडेवारीमध्ये पडू नका, त्या गणितामध्ये पडू नका असं मी सांगेल. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी आइन्स्टाइनला गणिताची मदत झाली नाही, असं वक्तव्य गोयल यांनी केलं.

Loading...

जर आइन्स्टाइन केवळ उपलब्ध गणिती सुत्रं आणि आधीच्या ज्ञानाच्या आधारावर अवलंबून राहिला असता तर नवीन शोध लागलाच नसता, अशीही पुष्टी गोयल यांनी पुढे आपल्या भाषणात जोडली.

गोयल यांच्या या वक्तव्यानंतर ट्विटवर Newton हा शब्द ट्रेण्ड व्हायला लागला. अनेकांनी गोयल यांना ट्विटवरुन ट्रोल केलं आहे.

Loading...

पियुष गोयल यांनी ‘पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्था’ धोरणाचा बचाव करताना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी वेळ मारून नेण्याच्या प्रयत्नात अजब वर्तव्य केलं खरं पण त्याच वक्तव्याची नेटकरी आता खिल्ली उडवत आहेत.

Loading...


महत्वाच्या बातम्या-

Loading...