बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही एक दोन विदेशी कंपन्या विकत घेतल्यामुळे देशहित कमी झालं”

वी दिल्ली | औद्योगिक क्रांतीने देशाला विकासाची वाट दाखवली. उद्योगांच्या माध्यमातून देशातील लोकांना काम मिळत गेलं. अन् त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाले. देशाला विकासाची वाट दाखवण्यात टाटा समुहाचा खूप मोठा वाटा आहे. जमशेदजी टाटा यांच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास अविरत सुरू आहे.

देशात उद्योग चालवणाऱ्या समुहाला विदेशी कंपन्या विकत घेण्याच्या नादात देशहिताचा विसर पडतोय, असं वक्तव्य केलंय केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. त्यांनी हे वक्तव्य 153 वर्ष जुन्या टाटा समुहाला उद्देशुन केलं आहे. यावरून आता वाद सुरू आहे. पीयूष गोयल यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

उद्योगासाठी देशपातळीवर काम करणारी काॅन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री संघटनेच्या वार्षिक बैठकीदरम्यान पीयूष गोयल यांनी हे वक्तव्य केलं. पीयूष गोयल यांनी बैठकीला उपस्थित असणारे टाटा सन्सच्या एका विभागाचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल यांना उद्देशून म्हटलं की, तुमच्यासारखी कंपनी एक-दोन परदेशी कंपन्या विकत घेते. त्यानंतर परदेशी कंपन्यांचे महत्त्व वाढते आणि राष्ट्रहित बाजूला पडते, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

गोयल यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातुन त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. प्रचंड वाद होत असल्याने त्यांच्या या वक्तव्याचा हा व्हिडिओ युट्युबवरून हटवण्यात आला आहे. या वादात आता राजकिय पक्षांनी सुद्धा उडी घेतली आहे. काॅंग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी या प्रकरणावरून पियुष गोयल यांच्यावर व मोदींवर प्रचंड टीका केली आहे. 

 

 

थोक्यात बातम्या

“फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची?”

आकाशाकडे बोट दाखवत कोहली थेट रिषभ पंतवर भडकला; पाहा व्हिडीओ

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये!

काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?, वाचा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More