मुंबई | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य सर्वांसाठी रेल्वेची सेवा बंद आहे. लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून मागणी करण्यात आली नाही, असं केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
अनलॉकच्या सुरू झालेल्या टप्प्यांमध्ये मुंबईतील लोकल सुरू करण्याबाबत अजून तरी कोणतीही मागणी महाराष्ट्र सरकारकडून मला प्राप्त झालेली नाही. मागणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असं पीयूष गोयल म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
बॉलिवूडवरील ड्रग्सबद्दलचे आरोप अक्षय कुमारला मान्य, म्हणाला…
“सुशांतच्या मृत्यूबाबत एम्सने दिलेल्या अहवालाने सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत”
….त्यामुळे आम्हालाही आमच्या आत डोकावणं भाग पडलंय- अक्षय कुमार
‘मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे