सहमतीने शरीरसंबंध! अभिनेता महिन्याभराने जेलबाहेर…

मुंबई | अभिनेता पीयूष सहदेवला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय. जामीन मंजूर झाल्यानं पीयूष तब्बल महिन्याभरानंतर जेलबाहेर आलाय. 

पीयूषविरोधात 23 वर्षीय मॉडेलने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 22 नोव्हेंबरला वर्सोवा पोलिसांनी त्याला अटक केली होती. 

न्यायालयाने त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, परस्पर संमतीने शरीरसंबंध झाल्यामुळे पीयूषला जामीन मिळाल्याचं कळतंय. मात्र पीयूषवर आणखी काही आरोप असल्याची माहिती आहे.