बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुप्रसिद्ध PK सिनेमाचा सिक्वेल येणार; आमीरच्या जागी ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत!

मुंबई | अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा सिनेमा ‘PK’ प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. 2014 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपुत, संजय दत्त, बोमन ईराणी, सौरभ शुक्ला यांसारखे कलाकार या चित्रपट होते. या चित्रपटात आमिरच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. याशिवाय चित्रपटातील कथा देखील लोकांना आवडली होती.

‘PK’ या चित्रपटाचा पुढील सिक्वेल लवकरच येणार आहे. या चित्रपटात कोणता कलाकार मुख्य भुमिकेत असणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. पीकेच्या शेवटी राजकुमार हिरानी यांनी पुढील भागात कोणता कलाकार असेल याचा इशारा दिला होता. अमिर खान सोबत अभिनेता रणबीर कपूर दाखवला होता. त्यामुळे आगामी चित्रपटात रणबीर मुख्य भुमिकेत असणार हे जवळजवळ पक्क झालं हाेतं.

निर्माता वधु विनोद चोप्रा यांनी सिक्वेलसाठी तयारी केल्याचं सांगण्यात येत आहे. पीकेची भूमिका रणबीर कपूर पुढे साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकृतपणे अभिनेत्याविषयी कोणतीही घोषणा केली गेली नाही.

वधु चोप्रा यांचे चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पीके चित्रपटावरून वाद देखील झाला होता. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप समाजमाध्यमांधून होत होता. त्यामुळे आगामी चित्रपट कोणत्या विषयावर असेल अशी देखील आतुरता सिनेप्रेमीमध्ये दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

बीडमध्ये मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर पार पडला विवाह, धनंजय मुंडे म्हणाले…

“स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?”

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधील फोटो!

कुलू मनालीला फिरायला जायचं का?; पूजा-गबरुशेठ मधील नवीन संभाषण समोर आल्यानं खळबळ

नव्या लुकसह ‘मारूती सुझुकी स्विफ्ट’ लवकरच बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More